नाशिक प्रतिनिधी: जिल्ह्यात काल दिवसभर निकालाची उत्सुकता लागलेली होती मात्र पहाटेपर्यंत मतमोजणी सुरू होती, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता परवा मतदान व काल मतमोजणी झाली अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मविप्रत ‘प्रगती’ पॅनल चा धुव्वा उडाला असून ‘परिवर्तन’ ने ऐतिहासिक बाजी मारली आहे. पहाटे सर्व निकाल हाती लागले असून तब्बल २० वर्षांनंतर मविप्र संस्थेत सत्तांतर झाले असून अनेक धक्कादयक निकाल लागले आहेत.
रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी सुरू होती, सरचिटणीस पदाची मतमोजणी संपली तेव्हा अॅड. नितीन ठाकरे यांना ५ हजार ३९६ मते मिळाली तर नीलिमाताई पवार यांना ४ हजार १३८ मते मिळाली आहेत. अॅड. ठाकरे यांचा १२५८ मतांनी दणदणीत विजय झाला आहे पवारांचा पराभव हा मोठ्या फरकाने झाल्याने सर्वच अवाक झाले आहेत.
20 वर्षांनंतर सत्तांतर
MVP मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत इतिहास घडला असून तब्बल वीस वर्षांनंतर डॉ वसंत पवार व त्यांनतर नीलिमा पवार यांची सलग 20 वर्षांची सत्ता अॅड. नितीन ठाकरे यांनी उलथून लावली आहे. यामुळे ठाकरे यांच्या विजयाचा सर्वत्र जल्लोष सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम