नाशिक: मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रणधुमाळी उडली आहे. कार्यकारी मंडळाच्या 24 जागांसाठी आज रोजी मतदान होत असून उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. जिल्ह्यात एकूण 53 बूथवर मतदान होणार असून संस्थेचे 10 हजार 197 सभासद मतदानाचा हक्क बजावतील.
सुरवातीपासून वेगवेगळ्या मुद्द्यांनी या निवडणुकीत सत्ताधारी नीलिमा पवार यांचे प्रगती पॅनल आणि अॅड. नितीन ठाकरे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत होत एकमेकांनी टीकास्त्र सोडले आहेत. या निवडणुकीत काही पदांकरीता अपक्ष स्वतंत्र उमेदवार देखील निवडणूक मैदानात आहेत. निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच कार्यकारिणीत उपाध्यक्ष आणि महिला प्रतिनिधींचे दोन अशा तीन अतिरिक्त जागांचा समावेश आहे. आज मतदान होवून सोमवारी (दि.29) रोजी मतमोजणी होणार असल्याने उत्सुकता ताणली जाणार आहे.
यंदा मविप्र संस्थेची सण 2022 ते 27 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक होत असून आज सकाळी 8 वाजेपासून संस्थेचे सभासद मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदानासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली असून. प्रचारादरम्यान दोन्ही पॅनलकडून विविध तालुक्यांमध्ये दौरा काढत सभासदांशी संवाद साधण्यासाठी सभा, मेळाव्यांचे आयोजन लक्षवेधी ठरले आहे.
सरचिटणीस पदासाठी नीलिमा पवार आणि अॅड.नितीन ठाकरे यांच्यातील सरळ लढत लक्षवेधी असून, अध्यक्षपदासाठी डॉ.सुनील ढिकले आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्यात काट्याची टक्कर आहे. सभापतीपदासाठी माणिकराव बोरस्ते व बाळासाहेब क्षीरसागर या निफाडवासीयांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. मतदार कोणाला आशीर्वाद देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहाणार आहे.
मतदानासाठी तयारी पूर्ण
रविवारी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान.
यावेळी प्रथमच उपाध्यक्ष, दोन महिला प्रतिनिधींसाठी मतदान, 6,844 पुरुष, 1,353 महिला सभासद करणार मतदान
6 रंगाच्या असणार मतपत्रिका
तालुकानिहाय सभासद संख्या
देवळा 567
सिन्नर 443
कळवण-सुरगाणा 348
नांदगाव 292
येवला 202
इगतपुरी 138
निफाड 2,903
सटाणा 1,416
नाशिक शहर 876
नाशिक ग्रामीण 707
दिंडोरी-पेठ 838
मालेगाव 783
चांदवड 684
एकूण 10,197
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम