देवळा : मविप्र च्या निवडणुकीसाठी देवळा तालुक्यात 567 मतदारांपैकी 550 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून सर्वाधिक 97 टक्के मतदान झाले. निवडणुकीला सकाळ पासूनच मतदारांनी प्रतिसाद दिला असून, जिल्हयातील सर्वात जास्त वयाचे जेष्ठ सभासद वय वर्ष 102 माजी आमदार जनुभाऊ आहेर यांनी तर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचे लोमेश कापडणीस वय वर्ष 19 याने आपला मतदानाचा हक्क बजावला .
प्रगती पॅनल कडून भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर तर परिवर्तन पॅनल कडून रामेश्वरचे माजी सरपंच विजय पगार हे समोरासमोर उमेदवारी करीत होते . मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतदानंतर परिवर्तन पॅनलचे नेते आमदार माणिकराव कोकाटे ,देवळा तालुका परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजय पगार ,प्रगती पॅनलचे उमेदवार केदा आहेर, मविप्रचे माजी संचालक डॉ विश्राम निकम ,प्रमोद पाटील ,देवळा बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रा हितेंद्र आहेर, नीलिमा आहेर आदींनी एकत्रित उपस्थित राहून निवडणूक शांततेत पार पडल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी दोन्ही पॅनलच्या नेत्यांकडून विजयाचा दावा करण्यात आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम