देवळा ; होऊ घातलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रगती पॅनलच्या प्रचारार्थ उद्या शनिवार दि १३ रोजी दुपारी ३ वाजता तुळजाई लॉन्स ,रामेश्वर फाटा ,देवळा येथे सहविचार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून , या पार्श्वभूमीवर देवळा येथे प्रगती पॅनलच्या प्रचारार्थ श्रीमती नीलिमाताई पवार व माणिकराव बोरस्ते आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवारी दि १३ रोजी दुपारी ३ वाजता तुळजाई लॉन्स , रामेश्वर फाटा ,देवळा येथे सहविचार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास तालुक्यातील सर्व सभासदांनी मोठ्या संसंखेने उपस्थित राहावे , असे आवाहन शेवटी प्रमोद दादा पाटील यांनी केले आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी देवळा तालुक्यातून केदा नाना आहेर, योगेश आबा आहेर ,प्रमोद पाटील , दिलीप आहेर, नारायण पवार , विजय पगार , केवळ देवरे ,डॉ विश्राम निकम , रामचंद्र आहेर या उमदेवारांचा आजच्या छाननी नंतर पात्र उमदेवारांच्या यादीत समावेश आहे . खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम