‘रक्षण कर रे श्री गणराया, मी मविप्र चा आणी मविप्र माझा’

0
38

सर्वांना सस्नेह नमस्कार
मी. दिपक अरुण चौधरी (सभासदाचा मुलगा) नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच चालू झालेली आहे या माध्यमातून सर्व नाशिक जिल्ह्यातील मतदारांना विनंती करतोय,

आदय संस्थापक, कर्मवीर, सहकार महर्षी यांच्या योगदानातून उभी राहीलेली मविप्र ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रिद वाक्य घेऊन चालणारी आपली संस्था संस्थेचे निष्ठावान सन्मानिय सभासद खरच सुखी आहे का…? गेल्या 5 ते 6 वर्षात सभासदाना अत्यंत त्रास झाला निवडणुक आली की सभासदाना महत्व प्राप्त होते निवडणुकीत तो सन्मानिय होतो इतरवेळी तो एक साधा सभासद असतो त्याला सत्ताधारी कवडी मात्र किंमत देत नाही, कष्ठकरी, शेतकरी सभासदाच्या मुलाना अॅडमिशन मिळत नाही पहिलेच शेतीमालाला भाव नाही कर्जबाजारी सभासद आणी त्याच्याकडुन लाखोचे डोनेशन मागता सभासदाचीच संस्था आणि त्यांच्याच मुलांना ऍडमिशन मिळत नाही. सत्ताधारानो ह्या वेळी सभासद तुम्हाला माफ करणार नाही….अन्यायाचा विरोधात पर्याय शोधायला हवा…. 2016 मध्ये ताई सरचिटनीस पदी विराजमान झाल्या बेकायदेशीर पणे हो बेकायदेशीरच….
2017 मध्ये सहानुभुती पोटी सभासदानी तुम्हाला निवडून दिले , निवडुन दिले त्याचे फळ सभासदाना चांगलेच मिळाले, मविप्रची खासगीकरण व हुकुमशाही कडे वाटचाल चालु करुण. या बद्दल सभासदानी ठामपणे निर्णय घेण्याची गरज आहे नाहीतर ही निवडणुक शेवटची असेल.

संस्थेच्या 486 हुन अधिक शाखा विस्तार अंदाजपत्रकात | सुमारे 750 ते 800 कोटी वार्षिक टर्नओव्हर आणी संस्थेचे निर्णय संस्थेत नाही गोदावरी बँकेत होतोत अस लोक म्हणतात . सरचिटणीस कोण हेच कळत नाही ताई आहे की मुलगा कि मुलगी आहे हेच कळेना अशी बाहेर चर्चा आहे.

सभासदानो नव्या चेहऱ्यांना संधी देवुन बघा त्यानाही नाही जमल तर 2027 ला आम्ही युवा आमच्या संस्थेच्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभा असणार आहे.

आम्ही युवा विचार करतोय मराठा विद्या प्रसारक समाजाच्या बाण्याचा, संस्थेच्या अस्मितेचा संस्थेच्या वर्तमान काळाचा विचार करतो समृद्धीचा आणी सभासदाच्या मुलाच्या भविष्याचा, आता गप्प बसून चालणार नाही बदल हा हवाच आपल्या संस्थेत आपल अस्तित्व टिकवण्यासाठी हीच ती वेळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रामुख्याने एकजूट होण्याची इथून पुढे ‘ हिटलरशाहीला थारा नाही.

म्हणूनच बदलून टाकु हि सर्व परिस्थिती आणी उजळुन टाकु विकासाच्या ज्योती सन्मानिय सभासरानो बंधू बघिणींनो मातानो एकजुटीने म्हणा रक्षण कर रे श्री गणराया मी मविप्र चा आणि मविप्र माझा “”
– धन्यवाद –
दिपक अरुण चौधरी
(शिवसेना उपविभाग प्रमुख नाशिक मध्य विधान सभा )
dipakchaudhari0@gmail.com
8600238837


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here