Mumbai Police Control Room: ‘काही लोक बॉम्ब बनवत आहेत, ते हल्ला करण्याच्या तयारीत..!

0
18

Mumbai Police Control Room: मुंबई पोलीस कंट्रोलला धमकीचा फोन आला आहे. एका व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन करून सांगितले की मुंबईत काही लोक बॉम्ब बनवत आहेत आणि हल्ल्याच्या तयारीत आहेत. फोन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास केला असता फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. कॉल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान अनेकदा माहिती चुकीची निघते.

मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. अनेकदा असे कॉल फेक असतात. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, असे आढळून आले की, हा कॉल अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे नाव बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे असे आहे.

shivsena court: कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले; दिले महत्त्वाचे निर्देश

धमकीच्या कॉलची यादी मोठी

याआधी 8 ऑगस्ट रोजी अशीच एक घटना घडली होती ज्यामध्ये मुंबईत एका 61 वर्षीय व्यक्तीला महाराष्ट्राच्या मंत्रालयाला धमकीचा फोन करून “दहशतवादी हल्ल्याचा” इशारा दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. एक-दोन दिवसांत ‘दहशतवादी हल्ला’ होईल, असे त्या व्यक्तीने सांगितले. नंतर त्याला अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी, राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) एका अज्ञात व्यक्तीकडून एक मेल आला होता, ज्यामध्ये आपण तालिबान सदस्य असल्याचा दावा केला होता आणि मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती. (Mumbai Police Control Room)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here