Mumbai News : दहिसर-मिरा मेट्रोखाली सौंदर्यीकरण; मेट्रो प्रवाशांसाठी गुड न्यूज

0
66

Mumbai News: मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दहिसर-मिरा मेट्रोखाली आता सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या पाच कोटी रुपयांच्या कामासाठी मुंबई एमएमआरडीएकडून(MMRDA) निविदा काढण्यात आली आहे.दहिसरला भाईंदरशी जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेखालील जागेचे सौंदर्यीकरण होणार आहे. अशा पाच कोटी रुपयांच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) निविदा काढलेली आहे.(Mumbai News)

देवळा नगरपंचायतीच्या वतीने “स्वच्छता ही सेवा” उपक्रम

दहिसर पूर्व भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस स्टेडियमशी जोडण्यासाठी मेट्रो-९ या उन्नत मार्गिकेची उभारणी होत आहे. या मार्गिकेचे काम ६० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, यामध्ये मेट्रोसह रस्ते वाहतुकीसाठी डबल डेकर पुलाचीदेखील उभारणी होणार आहे. जवळपास १२ किमी लांबीच्या या मार्गिकेवर आठ स्थानके असणार आहेत. याखालील भागाचे आता सौंदर्यीकरण होणार आहे.

Nashik News | दिंडोरी तालुक्यातील एका घटनेमुळे खळबळ

या मार्गिकेचा ३० टक्के भाग हा पश्चिम द्रुतगती मार्गावरून जातो. त्यानंतर ही मार्गिका पश्चिमेकडे काशिगाव, मेदेतियानगरमार्गे भाईंदरकडे वळते. यापैकी पश्चिम द्रुतगती मार्गावरील मार्गिकेचा भाग वाहतुकीने गजबजलेला आहे. त्यामुळे तेथील मार्गिकेखालील भाग खराब होण्याची शक्यता आहे. यासाठी या संपूर्ण मार्गिकेच्या खालील भागातील रस्त्याचे सौंदर्यीकरण (MMRDA) एमएमआरडीए करणार आहे. २५ प्रकारची कामे आणि जवळपास १६ प्रकारची वनस्पती आणि फुलांची झाडे लावून हे सौंदर्यीकरण होणार आहे. त्यासंदर्भात निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम सुमारे पाच कोटी रुपयांचे आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here