सिनेप्रेमींसाठी खुशखबर, अवघ्या ७५ रुपयांत मल्टिप्लेक्समध्ये मिळणार सिनेमाचं तिकीट !

0
34

मुंबई – देशभरातील दर्दी सिनेप्रेमींसाठी एक खुशखबर आहे. येत्या १६ सप्टेंबरला देशातील सर्व मल्टिप्लेक्स आणि इतर सिनेमागृहात अवघ्या ७५ रुपयांत सिनेमाचे तिकीट मिळणार आहे.

१६ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक सिनेमागृहांनी यंदा हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे औचित्य साधत देशभरातल्या अनेक सिनेमागृहात तिकिट शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय MAIने घेतला आहे. ज्यात पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज, सिटीप्राइड या बड्या सिनेमागृहांसह देशभरात सुमारे ४ हजार सिनेमागृहात अवघ्या ७५ रुपयात सिनेमाची तिकिटे विकली जाणार आहे.

‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (MAI)ने एका निवेदनात म्हटले की, कोरोना आणि त्यानंतरच्या काळात सिनेसृष्टीने विविध चढ-उतार पाहिले. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यात जागतिक आणि स्थानिक टेंट पोलच्या पार्श्वभूमीवर सिनेमा ऑपरेटर्समध्ये सकारात्मक संख्या नोंदवली गेली आहे. या तीन महिन्यात अनेक सिनेमांना तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आता हा दिवस प्रेक्षकांना संपूर्ण दिवस विविध चित्रपटांचा आनंद लुटता येईल. प्रेक्षकांनी कोरोना काळानंतर सिनेमागृहात जाऊन सिनेमे बघत पुन्हा थिएटर्स चांगल्याप्रकारे सुरु होण्यास मोठा हातभार लावला, त्यांचे आभार म्हणून आम्ही सिनेमांच्या तिकिटात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ७५ रुपयांना तिकिटे देण्याच्या योजनेत सहभागी होणारे थिएटर्स संबंधित सोशल मीडिया हँडलवर याबद्दल अधिक माहिती देतील. तसेच तिकिटांची किंमत फक्त ७५ रुपये असेल, पण बुकिंग अॅप्स त्यांचे शुल्क आकारू शकतात, असेही असोसिएशनने स्पष्ट केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here