स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एमपीएससी’कडून गुडन्यूज !

0
15

मुंबई – राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक आनंदाची बातमी आहे. लोकसेवा आयोगाकडून आता एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने ह्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या ११ मेला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ही जाहिरात केवळ १६१ पदभरतीची असल्याने परीक्षार्थीकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर MPSCकडून गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील ३४० पदे वाढवण्यात आली आहेत. त्यानुसार आता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावर उद्या (दि. २१) राज्य सेवा पूर्वपरीक्षा होणार आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. परीक्षा होण्यापूर्वीच पदांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

वाढवण्यात आलेल्या जागा (एकूण ३४० जागा)

गट ‘अ’ –

  • उपजिल्हाधिकारी – ३३
  • पोलिस उपअधीक्षक – ४१
  • सहायक राज्यकर आयुक्त – ४७
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी – १४
  •  उपनिबंधक,सहकारी संस्था – २
  • शिक्षणाधिकारी – २०
  • प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) – ६
  • तहसीलदार – २५

गट ‘ब’ –

  • सहायक गटविकास अधिकारी – ८०
  • उपअधीक्षक, भूमी अभिलेख – ३
  • सहायक निबंधक, सहकारी संस्था – २
  • उपशिक्षणाधिकारी – २५
  • सहायक प्रकल्प अधिकारी – ४२

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here