MPSC परीक्षेत ही ‘दांडीबहाद्दर’ ; 7500 विद्यार्थी गैरहजर

0
40

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात आज परीक्षा घेण्यात आल्या यात नाशिक मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. यावेळी तब्बल साडेसात हजार विद्यार्थ्यां परीक्षेला गैरहजर राहिले.

आज या परिक्षेसाठी(Exam) जिल्ह्यातून 22 हजार 419 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे(bhagvat doifode) यांनी दिली.

परीक्षेत 7 हजार 487 विद्यार्थी गैरहजर होते. जिल्ह्यातील 58 परीक्षा उपकेंद्रावर झालेल्या या परीक्षेसाठी 1 हजार 900 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व केंद्रावर परीक्षा शांततेत पार पडली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here