द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.
आयोगाने आपल्या वेबसाईटवर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली आहे.
या यादीत सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत. तर नाशिकमधून (nashik)220, नगरमधून 177(nagar), जळगाव 47(jalgaon), धुळे (dhule), 35 तर नंदुरबारमधून (nandurbar)10 जणांची निवड झाली आहे.
मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 लांबणीवर पडली होती. परीक्षेची तारीख लांबत असल्याने उमेदवारांकडून विविध मार्गांनी सरकारचं याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं.
विद्यार्थ्यांनी निकाल
https://mpsc.gov.in/downloadFile/english/3964
या साईटवर बघावा.
पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यात पुणे विभागातून सर्वाधिक 1 हजार 72 उमेदवारांची निवड झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम