MPSC देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

0
163

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या प्रकोपाने सर्व काही ठप्प झाले असल्याने, MPSC च्या परीक्षा देखील घेता आल्या नव्हत्या. या कारणास्तव वयोमर्यादेच्या नियमामुळे बरेच विद्यार्थी MPSC ची परीक्षा देण्यास मुकले असते.

मात्र शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे. यासाठी देखील हा निर्णय लागू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोनामुळे परीक्षा च होऊ न शकल्याने, परीक्षार्थी वर्गात नाराजी होती. आणि वयो मर्यादेच्या नियमामुळे हे विद्यार्थी परीक्षा देण्यास मुकले असते. मात्र आता राज्य शासना द्वारे हा निर्णय घेण्यात आल्याने, संबंधित विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

जवळपास दोन वर्षांपासून MPSC च्या परीक्षा कोरोना कारणामुळे होऊ शकल्या नाहीत. यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअर वर झाला असता. म्हणून राज्य मंत्रीमंडळाची नुकतीच बैठक पार पडली. यात आता हा वयोमर्यादा संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय सेवेत दाखल होण्याच्या उद्देशाने लाखोंच्या संख्येत विद्यार्थी MPSC ची तयारी करत असतात. यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतात. म्हणून परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा होण्याची वाट बघत होते.

मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तसेच इतरही कारणास्तव परीक्षा लांबणीवर पडलेल्या होत्या.

आता राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची किंबहुना MPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

दरवर्षी निघणाऱ्या चार-पाच हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. आणि त्या दृष्टीने निर्णय होणे आवश्यक होते.

मागील काही काळात वेगवेगळ्या कारणास्तव उत्तीर्ण झालेल्यांच्या नियुक्ती, परीक्षांचे निकाल देखील लांबणीवर पडलेले होते.

मात्र आता यापुढे तरी योग्य त्या नियोजनानुसार सारे काही पार पडेल, अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करताय.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here