अमरावती – येथील एका मुलीचे अपहरण करून बळजबरीने आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या. त्या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि त्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत जोरदार खडाजंगी झाली.
यावेळी त्यांनी त्या मुलीला समोर आणण्याची मागणी केली असता पोलिसांनी त्यांचा कॉल रेकॉर्ड केल्याचा दावा करत खासदार राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. तसेच, पोलिस ह्या प्रकरणात सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
नेमका काय आहे प्रकरण ?
अमरावती येथे एका तरुणाने एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिचे बळजबरीने आंतरधर्मीय विवाह लावण्यात आले. लग्नानंतर त्या मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवले आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणले असून पीडित मुलगी अद्यापही बेपत्ता आहे. यावरून त्या मुलीच्या कुटुंबीयांनी खासदार राणांकडे तक्रार केली आणि ह्या मुद्द्यांवरून त्यांनी पोलिसांशी बोलताना त्यांचा कॉल रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे त्या आक्रमक होत त्यांनी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापूर पोलीस ठाणे गाठले. यावेळी राणांनी पोलीस त्या मुलीला शोधण्यास आणि प्रकरणाची चौकशीस एवढा वेळ का लावत आहे ? आणि तुम्हाला माझे फोन रेकॉर्ड करण्याचे अधिकार कोणी दिले ? असा प्रश्न करत थेट पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. यावेळी पोलीस अधिकारी संतप्त होत त्यांना बाहेर काढण्यास सांगितले व दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम