द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तरकाशी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एक बस खोल दरीत कोसळल्यामुळे 20 हुन अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उत्तरकाशी येथील जानकीचट्टी जवळ हा भीषण अपघात घडला आहे.
मागील काही दिवसांत देशाला वेगवेगळ्या अपघातांनी हादरवून सोडले आहे. आता उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बस दरीत कोसळल्याने 20 हुन अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या बसमध्ये 28 जण प्रवास करत होते. हे सर्वजण मध्य प्रदेश येथील पन्ना जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेत 15 हुन अधिक जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 6 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून, जखमींना 50 हजार व मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम