खळबळ! पत्र्याच्या शेडमध्ये एकामागे-एक 10 हुन अधिक सिलिंडरचे स्फोट

0
28

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पुणे येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये 10 ते 12 गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ हा स्फोट घडला. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.

कात्रज भागातील या ठिकाणी स्वयंपाकाच्या 10 ते 12 गॅस सिलिंडरचे एकामागे एक स्फोट घडल्याने एकच खळबळ उडाली आणि घबराटीचे वातावरण पसरले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला.

दरम्यान, बेकायदा गॅस सिलिंडरचे रिफिलिंग सुरू असताना हे स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. अग्निशमन दलाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, आगीच्या प्रचंड ज्वाला पसरल्यामुळे घबराट पसरली होती. यात एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here