महिलेला मारहाणप्रकरणी मनसेने केली त्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

0
34

मुंबई – मुंबईत काल एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यावर ह्याप्रकरणी अखेर मनसेने संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करत त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मनसेच्या विनोद अरगिले या पदाधिकाऱ्याने काल एका महिलेला स्वागताचा बॅनर लावल्याच्या कारणावरून मारहाण केली होती. सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली. अखेर मनसेने त्या विनोदला पदावरून हटवत त्याच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, ह्याप्रकारणी विनोदवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला व अन्य दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, मनसेने या घटनेचा जाहीर निषेध करत पत्रकाद्वारे संबंधित महिलेची माफी मागितली आहे. महिलेशी या पदाधिकाऱ्याने केलेले वर्तन हे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय पक्षाला महिलांबाबत कायमच आदरच राखला जातो. तशा सूचना वारंवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही दिल्या गेलेल्या आहेत. मात्र सदर घटनेने मन विषण्ण झाल्याचे म्हणत पक्षाने कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here