मराठा आरक्षण | आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आरक्षणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. उपोषण केलं जात आहे. सर्वपक्षीय आमदारांच मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. यावेळी आमदारांनी मंत्रालयालाला कुलुप लावण्यात आलं होतं. पोलिसांकडून मंत्रालयाच टाळं उघडण्यात आलं आहे. तातडीने विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी यावेळी आमदारांकडुन करण्यात येत आहे. यावेळी या आमदारांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे. या सर्व आमदारांना अज्ञात स्थळी नेण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे.
मराठा आणि कुणबी एकच, सरसकट आरक्षण द्या! सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते आक्रमक
कोण-कोणते नेते आंदोलनात सहभागी?
मंत्रालय परिसरात सध्या आमदार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय परिसरात आंदोलन करता आहेत.
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घ्यावी. त्यांनी सरकारसमोर आपली बाजू मांडावी अशी मागणी सर्वसामान्य मराठा बांधव करत आहेत. तसेच सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी हे आंदोलक आमदार करत आहेत. याच मागणीला घेऊन आज मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी या आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणीही केली आहे.
मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. जरांगेच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावते आहे. पण आजच्या दिवसभरात सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आजपासून पुन्हा एकदा जलत्याग करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांचं सुरु असलेलं हे आंदोलन लक्षवेधी ठरते आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम