मुंबई: अधिवेशन सुरू असून आज यात वादाची ठिणगी पडली आहे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. सभागृह सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. जोरदार घोषणबाजीही सुरू असताना यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी एकमेकांना भिडल्याचं समोर आले आहे.
50 खोके अन् बोके! हातात गाजर, पोस्टरवर सरकारविरोधी घोषणा, विधीमंडळ परिसरात जोरदार सुरू असताना सत्ताधारी-विरोधक आमने- सामने आले अन् एकमेकांच्या अंगावर धावून आले. आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके ! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. यावर शिंदे गटाचे आमदार चांगलेच भडकले.
50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधक देत असताना त्याचवेळी सत्ताधारी पक्षही तिथे उपस्थित होता. यावेळी गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. यावेळी विरोधकांनी गाजर आणले होते. हे गाजर हाती घेत सरकारच्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा देण्यात येतात. या घोषणा एकूण शिंदे गटाचे आमदार भडकले यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवासातील खोके एकदम ओके! अश्या घोषणा सत्ताधाऱ्यांनीही दिल्या व वातावरण अजून गढूळ झाले.
विरोधकांची घोषणा
पहिल्या दिवसापासूनच विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. तर त्याचवेळी सत्ताधारी पक्षही तिथे उपस्थित होता. यावेळी गोंधळ झाला. विरोधकांनी गाजर आणले होते. हे गाजर हाती घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सत्ताधाऱ्यांची घोषणा
अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा देण्यात येत असून या घोषणा सत्ताधाऱ्यां रूचल्या नाहीत . विधिमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झाले. यावेळी सत्ताधारी पक्ष देखील आक्रमक झाला. लवासातील खोके एकदम ओके! अशा घोषणा सत्ताधाऱ्यांनी दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम