लाखो ग्राहकांना फटका; Vodafone-Idea चे नेटवर्क झाले गायब

0
39

मुंबई : देशातील आघाडीची मोबाईल सेवा कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल Vodafone-Idea नेटवर्क पुन्हा ठप्प झाले आहे.
अनेक भागात मोबाईलचे नेटवर्क डाऊन झाल्याने यामुळे लाखो ग्राहकांना याचा फटका बसला आहे. कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियावर ग्राहकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. काही यूजर्सना इंटरनेट वापरताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपल्या व्यथा मांडत तक्रार केली आहे.

ट्विटरवर अनेक व्हीआय युजर्सने तक्रार केली आहे की ते वापरत असलेले व्हीआय नेटवर्क चालत नाही. नेटकऱ्यांकडून सर्व्हर डाऊन असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हीआयचं नेटवर्क डाऊन असल्यामुळे अनेकांची कामं रखडली आहेत.

Air India च्या विमानाला हवेतंच लागली आग

यापूर्वी म्हणजेच २२ जानेवारीला व्होडाफोन-आयडियाने अलर्ट जारी केला होता. यामध्ये १३ तास युजर्स मोबाईलचा रिचार्ज करु शकणार नाहीत असे कळविण्यात आले होते. व्होडाफोन-आयडिया सिस्टीम अपडेट करण्याचे काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here