Microsoft | सर्वर डाउन..! भारतासह जगभरात बँक, विमानसेवा सारंच ठप्प

0
49
Microsoft
Microsoft

Microsoft |  जगभरात मायक्रोसॉफ्ट (Microsoft) विंडोज क्रॅश झाल्याने सगळ्याच कार्यालयांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अचानक मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या युजर्संना आपल्या  लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर एरर आल्याने त्यांचे काम ठप्प पडले आहे. तर, याचा फटका जगभरातील विमानसेवा, बँक तसेच मायक्रोसॉफ्टच्या आधारे काम करणाऱ्या इतरही कंपन्यांना बसला आहे. अनेक टीव्ही वाहिन्यांचे प्रसारणदेखील बंद झाले आहे यामुळे भारतासह अनेक देशांत काही विमान रद्द झाले. तर, काही उशीराने येणार आहेत. गेल्या तासाभरापासून मायक्रोसॉफ्ट क्रॅश झाले असून, सेवा ठप्प आहे. यामुळे एअरलाइन्ससह बँकांची कामंही रखडली आहेत.(Microsoft crash)

स्पाईसजेटच्या दिल्ली-नाशिक विमानात तांत्रिक बिघाड; अर्ध्यातूनच परतले विमान

Microsoft | ही समस्या कशामुळे निर्माण झाली..?

तर, भारत, ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर याचा मोठा परिणाम झाल्याने विमानसेवा विस्कळीत झाली आहे. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात मायक्रोसॉफ्टच्या सर्वरमध्ये निर्माण झालेली ही समस्या Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे झाली आहे. यामुळे स्टोरेज व कॅप्यूटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. याचा परिणाम कनेक्टिव्हिटी फेलियरमध्ये झाला असून, यामुळे युजर्सच्या लॅपटॉप, कॅप्यूटर स्क्रीनवर रीस्टार्ट करण्यास सांगितले जात आहे. तसेच BSOD समस्या निर्माण झाल्याचे दिसत आहे. ही अडचण सोडवण्यासाठी तुम्ही काय करू शकतात. याची माहितीही मायक्रोसॉफ्टने जाहीर केली आहे.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी – तांत्रिक मांत्रिकावर कडक कारवाई करा

ही तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी काय कराल..?  

Windows सुरक्षित मोड किंवा Windows Recovery Environment मध्ये बूट करा.
यानंतर त्यांना C:\Windows\System32\drivers\CrowdStrike डिरेक्टरीवर जा.
नंतर त्यांना C-00000291*.sys फाईल शोधा आणि ती हटवा.
आणि तुमचे लॅपटॉप, कम्प्युटर रीस्टार्ट करा.(Microsoft solution)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here