Michaung Cyclone | बंगाल उपसागरात चक्रीवादळ; राज्यात पुन्हा अवकाळीचा धोका

0
19

Michaung Cyclone | भारतात पुन्हा नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे. बंगालचा उपसागरात कमी दाबाचा टप्पा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होणार आहे. यामुळे 3 डिसेंबर रोजी नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ येणार आहे. त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस पडू शकतो. या चक्रीवादळामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. तसेच देशाच्या दक्षिण भागात या चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे.

तीन ते पाच डिसेंबरपर्यंत दिसणार परिणाम

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे निर्माण झालेले क्षेत्र चक्रीवादळामध्ये बदलणार आहे. 3 डिसेंबरपासून 5 डिसेंबरपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केलेला आहे. IMD कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. बंगालचा उपसागरात निर्माण झालेले हे चक्रीवादळ ताशी ९ किमी वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जाते आहे. आता पुढील 12 तासांत हे वादळ खोल दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित होणार आहे.

Gold Silver Rate | ऐन लग्नसराईत सोने-चांदीची दरवाढ काही थांबेना

चक्रीवादळामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतर्क

‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या धोक्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झालेले आहे. केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी बैठक घेत आढावा घेतलेला आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील 12 जिल्हा प्रशासनसोबत बैठक घेत खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. चक्रीवादाळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये तापमान घसरणार असून हवेचा कडाका वाढणार आहे.

Breaking | चांदवडमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा केंद्रीय मंत्र्यांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

ऑक्टोंबर महिन्यात आले होते ‘तेज’

अरबी समुद्रात दोन महिन्यांपूर्वी तेज चक्रीवादळ आलेले होते. 21 ऑक्टोबर रोजी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्याचक्रीवादळास ‘तेज’ हे नाव देण्यात आलेले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ 26 ओमानच्या दिशेने जाऊन शांत झालेले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here