
देवळा ; बँक ऑफ महाराष्ट्र भऊर शाखेत झालेल्या आर्थिक अपहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा ,अशी मागणी आ.डॉ. राहुल आहेर यांनी आज मालेगाव येथे झालेल्या विभागीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घेत सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याबाबतच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिल्या.
निवेदनाचा आशय असा कि , बँक ऑफ महाराष्ट्र भऊर् ता.देवळा ह्या शाखेतील काही कर्मचारी यांनी कोट्यावधी रुपयाचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.सदर शाखेत परिसरातील भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा,
वरवंडी, बगडू आदी गावातील शेतकरी खातेदार असून, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. सध्यस्थितीत सदर आर्थिक अपहाराचा तपास देवळा पोलीस करत असून यातील चार आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
सध्या शेतीचे कामे सुरु असल्याने शेतकरी वर्गाला शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची निकडं असल्याने त्यांच्या खात्यावरील पैसे तात्काळ मिळणेसाठी तपास जलदगतीने करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे . त्यामुळे सदर गुन्ह्याच्या तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा असे शेवटी आमदार आहेर यांनी निवेदनात म्हंटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम