महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

0
7
देवळा- भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या अपहार प्रकरणातील आरोपी भगवान आहेर समवेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील,पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे ,निलेश सावकार आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; तालुक्यातील भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणारया आरोपीस न्यायालायने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी दिली .

महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेतील ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बँकेतील सफाई कर्मचाऱ्याला (दि १४ )रोजी अटक करण्यात आली असून , त्याला शुक्रवारी( दि १५) रोजी देवळा पोलिसांनी कळवण न्यायालयासोमर उभे ;केले असता न्यायालयाने सदर आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे . याबात अधिक माहिती अशी कि ,देवळा तालुक्यातील भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या शाखेत सफाई कामगार असलेला कर्मचारी भगवान आहेर याने खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे .

या अफहार प्रकरणी बँकेच्या अन्य ठेवीदार व खातेदारांनी दोन दिवांपासून आपली खाते तपासणीसाठी रीघ लावली असता सदरची रक्कम यापेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे .याबाबत सदर बँके कडून अद्याप किती रकमेचा अपहार झाला हे कळू शकले नाही . मात्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 32 खातेदारांची 1 कोटी 50 लाख 73 हजार450 रुपयाच्या रकमेची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे .

याबाबत देवळा पोलिसांत मालेगाव येथील बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी फिर्याद दिल्याने व खातेदाराची बँके कडे रीघ लागल्याने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपी चा शोध घ्यावा अशी सूचना केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी आरोपी भगवान ज्ञानदेव आहेर याला गुरुवारी (१४) रोजी दुपारी त्याचा शोध घेऊन सापळा रचून सोग्रस फाटा ता चांदवड येथून त्याला अटक करण्यात आली . शुक्रवारी ( दि १५) रोजी सदर आरोपीला कळवण न्यायालयात उभे केले असता त्याला सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे . अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी दिली .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here