मेतकर पतसंस्थेच्या वतीने नऊ टक्के लाभांश जाहीर

0
50

देवळा ; येथील मधुकर पांडुरंग मेतकर पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुरेश नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दि १६ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात सपंन्न झाली . यावेळी सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली . तसेच संस्थेच्या वतीने सभासद पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला .

 

संस्थेच्या सभासदांची विविध ठिकाणी वर्णी लागल्याने त्यांच्याहि यावेळी सत्कार करण्यात आला. सभेला संस्थापक दिलीप मेतकर ,चेअरमन सुरेश नेरकर ,व्हा चेअरमन केतन लुंकड ,संचालक माधुरी मेतकर ,अजय मेतकर ,विष्णू जाधव, संतोष शिंदे ,जाकीर शेख ,तेजस मेतकर ,नानाजी चंदन ,नितीन आहेर ,गिरीश कचवे , शुभांगी मेतकर उपस्थित होते . अहवाल वाचन माजी व्यवस्थापकी के. एम. देवरे यांनी केले . आभार दिलीप मेतकर यांनी मानले . सभा यशस्वीते साठी सचिव संदीप देवरे ,भुषण शिरसाठ ,संदिप भामरे, ज्ञानेश्वर मेतकर ,अनंता अलई आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here