पुणे : जगातील मोठ्या कार कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीचा उच्चपदस्थ अधिकारी पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकला. आता म्हणाल, हे सगळे खोटे असेल. तर तसे घडलेही, कारण तसा अनुभव आलाय जगातील सर्वात आलिशान गाड्या बनवणाऱ्या मर्सिडीज बेन्झ या कंपनीच्या सीईओ मार्टिन श्वेंक यांना.
झाले असे की, मर्सिडीज बेन्झ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक हे त्यांच्या मर्सिडीज एस क्लास या प्रसिद्ध गाडीने प्रवास करत होते. मात्र प्रवासादरम्यान ते पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले आणि त्यांना आपली कार रस्त्यात सोडून थेट रिक्षाने प्रवास करावा लागला. त्यांचा हा अनुभव त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकांंऊटवर शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये ते म्हणतात, की “तुमची एस क्लास गाडी जर पुण्याच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडली तर तुम्ही काय कराल ? कदाचित कारमधून उतरुन चालायला सुरुवात कराल. व काही किलोमीटर गेल्यानंतर रिक्षा पकडाल ?” असे कॅप्शन देत त्यांनी रिक्षाच्या मागील सीटवरुन काढलेला फोटो शेअर केला आहे. दरम्यान, त्यांच्या ह्या पोस्टला नेटकऱ्यांकडून अनेक मजेशीर कमेंट येत आहे. त्यात एकाने ‘माझी गाडी अशी अडकली असती तर मी गाडीमध्ये बसून राहिलो असतो’ असे म्हटले आहे. तर ‘मी माझ्या महागड्या गाडीमध्ये बसून ही कोंडी सुटेपर्यंत आहे त्या ठिकाणी वडापाव मागवला असता’ अशी कमेंट केली आहे.
https://www.instagram.com/p/CjGXSRTN_V6/?utm_source=ig_web_copy_link
मार्टिन श्वेंक हे २०१८ पासून मर्सिडीज बेन्झ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. यापूर्वी ते कंपनीच्या चीनचे मुख्य आर्थिक नियोजन अधिकारी होते. २००६ पासून ते या कंपनीसोबत जोडलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी जी ‘एस क्लास’ कार अर्ध्या वाटेत सोडली तिची किंमत भारतात तब्बल १ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे.
आता पुणेच काय, सर्वच शहरात वाहतूक कोंडीने सर्वसामान्यांना जितका त्रास होतो. तितकाच त्रास मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीलाही होत असतो, हे यानिमित्ताने दिसून आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम