Marathwada Earthquake | महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यांत भूकंपाचे तीव्र धक्के

0
43
Marathwada Earthquake
Marathwada Earthquake

Marathwada Earthquake |  मराठवाड्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे अनेकजण घाबरुन घराबाहेर पळाले. नांदेड जिल्ह्याच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती असून, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ अशी नोंदवण्यात आली आहे. तर यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यातही याभागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.(Marathwada Earthquake)

Earthquake:दिल्ली एनसीआर, चंदीगड आणि पंजाबसह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के

Marathwada Earthquake |भूकंपाचं केंद्र हिंगोलीजवळ 

दरम्यान, यावेळी हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले असून, भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यात असून ३.६ आणि ४.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के होते. हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे तब्बल दोन धक्के जाणवले असून, या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे आहे.(Marathwada Earthquake)

याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील गावांना जाणवली असून, येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या धक्क्यांमुळे येथील अनेक घरांच्या भिंतीना भेगा गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकाएकी घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  (Marathwada Earthquake)

Nashik  News |  त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here