विकी गवळी (चांदवड) : Breaking News | चांदवड येथे मराठा आंदोलनाल तापलेले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळलेले आहे. मराठा समाज चांदवडमध्ये आक्रमक झालेला पहायला मिळत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर टायर जाळून मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक आलेले आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ‘चांदवड बंद’ ठेवण्यात आला आलेलं आहे. यासर्व घटनेमुळे मुंबई -आग्रा महामार्गावर वाहतूक ही काही काळ बंद झालेली होती.
Nashik News | खरीपात शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं; आता रब्बीवर आहे मदार
एकीकडे राज्यभर मराठा आंदोलन पसरले असून आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे. तर नाशिक शहरामध्ये देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला असून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. आज नाशिक तालुका परिसरातील गावांनी एकत्र येत पुन्हा एकदा भव्य पायी मूक मोर्चा काढण्यात आला. नाशिक-पुणे मार्गावरील शिंदे गावापासून ते नाशिकरोडपर्यंत असा अकरा किलोमीटरचा हा भव्य मोर्चा काढण्यात आला.
मराठा आरक्षण | केंद्रात तोडगा निघाला नाही तर ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा! ठाकरेंचा हल्लाबोल
शिंदे-पळसे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या भव्य पायी मूक मोर्चाला सुरवात झाली. यानंतर पळसेमार्गे चेहेडी, सिन्नर फाटा नाशिकरोड पर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारो मराठा समाज बांधव एकवटल्याचे पाहायला मिळाले. त्यात मोहगाव, शिंदे-पळसे, बाभळेश्वर, चेहेडी, जाखोरी, चांदगीरी कोटमगाव, सामनगाव, नानेगाव, शेवगेदारणा, वडगाव आदी गावांसह परिसरातील मराठा बांधवानी या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळालं आहे. मराठा समाजाला हक्काचा आणि कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळावं तसेच मराठा बांधवांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे यासाठी भव्य पायी मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी नाशिकरोड या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर याच ठिकाणी एकूण तीन उपोषण सुरु असून यातील एका ठिकाणी एक महिला आपल्या सात महिन्याच्या बाळासह उपोषणासाठी बसलेली असल्याचे पाहायला मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम