Maratha reservation| मराठे पेटले; आधी गाडी फोडली,आता एसटी..

0
27

Maratha reservation|  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं आंदोलन मराठवाड्यात चांगलंच पेटलेलं बघायला मिळत आहे. एकीकडे जालना येथे महिला तहसीलदाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, नांदेड तसेच बीड जिल्ह्यात एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आल्यामुळे वातावरण तापले आहे.

दरम्यान, ह्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यातील सर्व बस सेवा रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच हिंगोली, परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यातीलही बस सेवा बंद केली आली आहे. ह्या चार जिल्ह्यात अंदाजे २८०० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणाच्या ह्या आंदोलनाचा परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसला आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक आणि हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार परिवहन महामंडळाने बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. परभणी व हिंगोली ह्या दोन जिल्ह्यातील ३८० बसेसच्या २८०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. जवळपास ३५० बस आज जागेवर उभ्या आहेत. तसेच, आज सायंकाळी पाच वाजेनंतर उद्या बस सुरु राहतील की नाही यावर निर्णय घेतला जाईल. (Maratha reservation)

कांदा उघड्यावर टाकण्याची वेळ येते तेव्हा…; पाशा पटेलांचा सरकारला घरचा आहेर

महिला तहसीलदाराची गाडी फोडली… 

जालना येथील मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. मराठा आंदोलकांकडून तहसीलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे. जालन्यातील रामनगर येथे ही घटना घडली आहे. बाजीउम्रद येथील मोबाईल टॉवरवर चढलेलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलं आहे. तहसीलदार यांनी चर्चेसाठी गावात यावे, अशी गावकऱ्यांची मागणी होती. दरम्यान, यासंदर्भात रामनगर येथे आंदोलकांकडून रस्ता रोको करण्यात आला आहे. आणि यावेळीच आंदोलनस्थळा जवळून जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

बसवर दगडफेक…

बीड व नांदेडमध्ये आज बसवर दगडफेक करण्यात आली. बीडवरुन कल्याणकडे जाणाऱ्या बसवर चराटा फाटा येथे आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरवून ह्या बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, दुसऱ्या घटनेत नांदेडच्या माहूर तालुक्यात आष्टा फाटा येथे अज्ञात मंडळींनी बसवर दगडफेक केली आहे. यात एसटी बसचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे ह्या घटना बघता महामंडळाकडून खबरदारी म्हणून एसटी बस सेवा रद्द करण्यात आली आहे. (Maratha reservation)

chandwad| चांदवडमध्ये हुंडाबळी..; त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here