मराठा आणि कुणबी एकच, सरसकट आरक्षण द्या! सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते आक्रमक

0
20

Maratha Aarkshan | सह्याद्री अतिथी गृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडत आहे. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता आपली भूमिका मांडत आहे.
तर दुसरीकडे त्रुटी काढून आरक्षण देऊ अशी ग्वाही मुख्य्मंत्र्यानी दिलेली आहे.

DS Baba: ‘तुझा देवळा आता तालुका झाला’…; आठवणीतील डॉ. डी. एस. बाबा

मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर आज सकाळी साडेदहा वाजेपासून सर्वपक्षीय बैठक पार पडते आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होत आहे. शरद पवार, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर आहेत.  मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था टिकवण्याकरता सर्वपक्षीयांचा सहयोग आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याकरता सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींनी आवाहन करणे गरजेचं असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.

Gas price: सणासुदीत गॅसचा भडका ! सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडर महागला

सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते आक्रमक

  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आशिक चव्हाण यांनीदेखील आपली भूमिका मांडलेली आहे.
  • मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केलेली आहे.
  • राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे असं मत अमादास दानवे यांनी या बैठकीत मांडलेल आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर सरकारने ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याच देखील दानवे म्हणले आहे.
  • आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही आपली भूमिका मांडलेली आहे.

या बैठकीत मुख्यमत्री आणि त्यांच्या बाजूला शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. या बैठकीत आता काय काय निर्णय होतं ते पाहणं महत्वाचं ठरेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here