Manoj Jarange | जरांगेंनी भुजबळांचं टेन्शन वाढवलं!; ‘इथं दोघांना पाडा’ येवल्याच्या सभेत जरांगेंचे आवाहन

0
59
#image_title

Manoj Jarange | विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून नेते मंडळींकडून अखेरचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच आज मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले असून आज पासून मनोज जरांगे यांचा नाशिकच्या येवल्यातून सांत्वन दौरा सुरू झाला आहे.

Manoj Jarange Patil | नारायणगडावर मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन; आरक्षण मिळवल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही- मनोज जरांगे

भुजबळांच्या चिंतेत वाढ

येवला लासलगाव मतदार संघात जरांगे पाटील यांच्या सांत्वंन दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते. येवला लासलगाव मतदार संघ हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जात असून मनोज जरांगे पाटील यांनी माईक हातात घेताच, “त्या दोघांना पाडा” असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. ज्यामुळे ऐन निवडणुकीच्या आधी भुजबळांच्या चिंतेत वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत. मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदार संघातून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे निवडणुकीच्या रणांगणात आहेत. त्यामुळे येवला मतदार संघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत रंगणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ व जरांगे पाटील यांच्या मधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. अशातच मनोज जरांगेंच्या सांत्वन दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. “जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय” म्हणत जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली व “इथे त्या दोघांना पाडा” असं वक्तव्य केले ज्याला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

Manoj Jarange | आठ दिवसांनंतर मनोज जरांगें कडून उपोषण सोडण्याची घोषणा!

काय म्हणाले मनोज जरांगे

पुढे बोलत त्यांनी, “येवल्यातील ही माझी सांत्वन पर भेट आहे. आता रस्त्यावर गाव आहे ते बाजूला सारू का?” असे म्हणत नाव न घेता टोला लगावला. “कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही. पण मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा.” असे म्हणत भुजबळांवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. “येवल्यात विशेष काही नाही. येवला काय राज्याच्या बाहेर नाही. माझ्या पोटात एक व ओठात एक असं काही नाही. मी ठरवले तर डायरेक्ट कार्यक्रम करतो. “कोण बरोबर असल्याने काही मत पडत नाहीत. बरोबर असून कार्यक्रम होतो. असे म्हणत “माझ्यासोबत मराठा आहे.” या भुजबळांच्या दाद्यावरून जरांगेंनी त्यांची खिल्ली उडवली. दरम्यान, यावेळी मनोज जरांगे यांनी सत्ता स्थापन झाल्यानंतर आंतरवालीत सामुहिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली. असून उपोषणाला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी वेळ केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here