Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद पेटलेला असून, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जिल्हा पातळीवर मराठा समाजाची ‘शांतता रॅली’ सुरू आहे. यातच आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
तसेच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हेच राज्यात दंगली घडवणार आहेत. त्यांना आवरा, देवेंद्र फडणवीसांच्या या सरकारमध्ये छगन भुजबळ आहेत आणि भुजबळ हे जातीयवाद निर्माण करताय. त्यांनी ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभं करण्याचं काम केल्याचे आरोप जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केले आहे.
मी आणि माझा समाज एका बाजुला, सगळे ओबीसी नेते एका बाजुला
राज्यात मराठा आणि ओबीसी वाद कधीही होणार नाही. पण मंत्री छगन भुजबळ हे महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. कारण छगन भुजबळांना या सरकारनेच बळ दिलं आहे. त्यांना सरकारमध्ये घेतलं आणि मंत्रीपदही दिलं. ते या पदाचा गैरवापर करत असून, त्यांनी सर्व ओबीसी नेते माझ्याविरोधात उभे केले. मी आणि माझा समाज हा एका बाजुला आणि सगळे ओबीसी नेते एका बाजुला झाले आहेत. हे सर्व नेते राजकीय स्वार्थासाठी सर्व काम करत असल्याची टिका यावेळी मनोज जरांगे यांनी केली.
Manoj Jarange Patil | अजित पवारांचे लोक मराठ्यांना लक्ष्य करताय
अजित पवार सत्तेत असून, त्यांचे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे लोक मराठ्यांना लक्ष्य करण्याचे काम करत आहेत. आम्ही काय महायुती किंवा महाविकास आघाडी यांना बघायला आलेलो नाही. हे सरकार फक्त वेळ मारुन नेत असून, आम्ही कोणाच्याही फायद्यासाठी काम करत नसल्याचेही यावेळी जरांगे म्हणाले.
Manoj Jarange | ‘६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात…’; जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन
धनंजय मुंडे यांचे कौतुक
बीडमध्ये शांतता जनजागृती रॅलीला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याचे संदेश आले. मात्र, धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले. यावरून जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. तुमच्या लोकांकडून मराठ्यांना त्रास होत आहे. त्यांना आवरा असेही त्यांनी मुंडे यांना सांगितले असून, बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जाऊन मराठ्यांना शिवीगाळ करण्यात आली, असे होऊ देऊ नका आणि तुम्ही मराठ्यांना लक्ष्य करु नका असेही ते धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम