बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे मूळगाव असणाऱ्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर, या घटनेमुळे गावात आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून, रात्रीपासून या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. दरम्यान, हा डीजे वाजवण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला आणि हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
तर, दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) व आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा महाराष्ट्रभर सुरू असून, काल ही यात्रा बीडमध्ये आली असता, रात्री गोपीनाथ गड आणि नंतर भगवानगड येथे जाण्याचा असा त्यांचा नियोजित दौरा होता. मात्र, त्यापूर्वीच सायंकाळी जरांगे यांच्या गावी मातोरी येथे ही दगडफेकीची घटना घडली. यावेळी रस्त्यावरीलही अनेक गाड्यांवर दगडफेक झाली. एवढंच नाहीतर बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रात्रभर रास्तारोकोदेखील करण्यात आले. (Manoj Jarange)
Manoj Jarange | ‘६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात…’; जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन
Manoj Jarange | जरांगेंचे आरोप; भुजबळांना दंगली घडवायच्यात..?
दरम्यान, या घटनेवरून मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर आरोप केले असून, मातोरी गावातील दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा आणि त्यांनीच त्यांच्या लोकांना ही दगडफेक करायला सांगितली असावी. कारण छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राज्यभरात दंगली घडवायच्या असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भुजबळांवर बारीक लक्ष ठेवावं, असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केले आहेत.(Manoj Jarange)
तसेच भुजबळांना वडीगोद्रीतच दंगल घडवायची होती. पण मी त्यांचा डाव उधळून लावला, त्यामुळे त्यांना आता राज्यात दंगली घडवून मराठा-ओबीसी यांना भडकवायचे आहे, असा दावाही मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच आमच्या राज्यच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्या मराठा बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी कले आहे.
Manoj Jarange Patil | पवार साहेबच म्हणाले होते, मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे.? – गिरीश महाजन
काय म्हणाले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके..?
दरम्यान, या घटनेबाबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दोन्ही समाजांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, आरक्षण मागणाऱ्यांनी आणि आरक्षणाचे रक्षण करणाऱ्यांनी दोघांनीही कायदा हातात घेऊ नका. शांत राहा आणि गावाची शांतताही बिघडू नका, रोज आपल्याला एकमेकांचीच तोंड पाहायची आहेत. भांडण व हिंसा करणे हा यावरचा उपाय नाही, असे ते यावेळी म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम