Manoj Jarange | मराठायोद्धा जरांगेंची तब्येत खालावली; पण, तरीही सभा करणारच

0
16
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange |  मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, ह्या  मागणीसाठी आता चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा राज्यव्यापी दौरा करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोमवार (दि. ११ ) रोजी बीडयेथील अंबेजोगाईच्या सभेच्या दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली.

दरम्यान, त्यामुळे त्यांना अंबेजोगाई येथील थोरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आणि प्रचंड अशक्तपणा देखील आलेला असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे. पण, तरीही आजच्या नियोजित सभांना जाण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी दर्शविली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील उपोषण स्थगित केल्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून जरांगे पाटील हे वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत तिथे जाऊन सभा घेताना दिसत आहे. त्यांच्या अनेक सभा ह्या मध्यरात्री तर, पहाटेपर्यंतही सुरू असल्याचे देखील बघायला मिळाले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती ही खालावली असून, सोमवारी सुरवातीला धारशिव जिल्ह्यातील लोहारा ह्या तालुक्यातील माकणी-करजगाव येथील सभेत त्यांची प्रकृतीही थोडी खालावली. त्यामुळे त्यांनी त्या सभेत स्टेजवर बसूनच भाषण केले.

Maratha Reservation | आज मराठ्यांचे भवितव्य ठरणार; दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू

पण, पुढे बीडमधील अंबेजोगाई येथील सभेदरम्यान, त्यांना आणखी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तिथेही स्टेजवर बसूनच संबोधित केले. त्यानंतर सभा पार पडताच त्यांना तातडीने तेथीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना ताप असून, शरीरात प्रचंड अशक्तपणा असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी आता विश्रांती घेणं हे अत्यंत महत्वाचे असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तरीही जरांगे हे आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.

आशा आहेत जरांगेंच्या आजच्या सभा

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, काल त्यांनी बीडमधील अंबेजोगाई येथे सभा घेतली. तसेच, त्यांच्या आजच्या नियोजित दौऱ्यानुसार आज बीडच्या केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे सकाळी दहा वाजता त्यांची पहिली सभा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता ते धारूर येथे तर,  तीन वाजता माजलगाव येथे त्यांची सभा होणार आहे. तसेच, त्यांच्या ह्या दौऱ्याचा समारोप देखील माजलगाव येथील जाहीर सभेने होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मुख्यमंत्री करा…!

१७ डिसेंबरला पुढील भूमिका

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंतची वेळ मागितलेली असून, आता ती मुदत जवळ आलेली असतांनाही मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक प्रमुख मागण्या अजूनही मान्य करण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे आता ह्या आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे हे १७ डिसेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक घेणार आहेत. तर, या बैठकीत आता पुढील कोणते निर्णय घेण्यात येताय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here