Manoj Jarange | असा आहे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा कसमादे दौरा

0
66
Manoj Jarange
Manoj Jarange

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीचा दिवस करून समाजाला न्याय मिळवून देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे यापुर्वीच जाहीर करण्यात आलेल्या नियोजित कार्यक्रमानुसार बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ऐतिहासिक साल्हेर मुल्हेर किल्ल्याला भेट देण्यासाठी येत आहेत.(Manoj Jarange)

Malegaon | राणेंनी ‘मिनी पाकिस्तान’ म्हटल्यावर नामदार भुसे आक्रमक भूमिका का घेत नाही?

Manoj Jarange | असा आहे दौरा

७ तारखेला रात्री उशिरा नाशिक मुक्कामी येऊन (दि ८) रोजी सकाळी ७ वाजता नांदुरी येथील आई भगवती सप्तसुंर्गी देवीचे दर्शन घेऊन ते कळवण येथील भव्यदिव्य अशा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सकाळी ९ वाजता पुष्पहार अर्पण करून पुढे देवळा येथील भव्य अशा शिवस्मारकाला अभिवादन व पुष्पहार अर्पण करून लोहोणेर, ठेंगोडा येथील स्वयंभु सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेऊन ते सटाण्याकडे रवाना होतील. दुपारी ११ वाजेच्या दरम्यान जरांगे पाटील हे सटाणा येथील चौफुलीवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून ते दुपारी विरगाव ताहाराबाद मार्गे किल्ले मुल्हेर कडे रवाना होतील.(Manoj Jarange)

NCP | राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगाच्या निकालात नवा ट्विस्ट

(दि ८) फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता ते नाशिकहुन वणी गडावर हजारो समाज बांधवांना बरोबर घेऊन दिंडोरी, कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातुन हजारो माता, भगिनी, समाज बांधवांना भेटणार आहेत. त्यामुळे कसमादेमध्ये उत्सवाचं वातावरण पसरले आहे. पहिल्यांदाच कसमादेच्या पवित्र भुमित जंरागे पाटलांचे आगमन होत असल्याने कसमादे भागातील हजारो समाज बांधवांनी जंरागे पाटलांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकचे समाज बांधव श्रीराम कुरणकर पाटील, करण गायकर, विलास पांगरकर, नाना बच्छाव, आदींनी केले आहे.  (Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here