Manipur update : मणिपूर मध्ये दोघा महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याचा संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
४ मे ला ही घटना घडली असून घटनेच्या दिवशी अत्याधुनिक शस्त्र हाती असलेले जवळपास एक हजार लोक बी फिनोम गावात घुसले. त्यांनी घरांना आग लावली. लोकांची हत्या केली, एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि महिलांची विवस्त्र धिंडही काढली. एवलढे सगळे होत असताना ज्यांनी महिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला त्यांची हत्या करण्यात आली. सशस्त्र गुंडांनी या घटनेचा व्हिडियो काढून तो व्हायरल सुद्धा केला. मैतेई युवा संघटना, मैतेई लिपून, कांगलेईपाक कनबा लूप, अरामबाई तेंगगोल, विश्व मैतेई परिषद या संघटनांनी हा हल्ला केला होता.
यातील एका २१ वर्षीय महिलेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याची हत्या करण्यात आली. तिच्यासह आणखी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. पैकी दोन महिलांनी जीव वाचवला आणि गावकऱ्यांच्या मदतीने पळून गेल्या. मात्र २१ वर्षीय महिलेवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार करण्यात आला.
सशस्त्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी जंगलात आश्रय घेतला. पण त्यातील पाच लोकांना नराधमांनी घेरले. यामधील ५६ वर्षांच्या एका व्यक्तीची जागेवरच हत्या करण्यात आली. तर २१, ४२ व ५२ वर्षांच्या तीन महिलांची विवस्त्र धींड काढण्यात आली. आणखी एक १९ वर्षांचा तरुण कसाबसा जीव वाचवून पळाला.
संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या घटनेवरून गदारोळ सुरू झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले होते. दोन महिन्यांपासून सरकारने मणीपूरमधील हिंसा रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे.
https://thepointnow.in/father-and-father-in-law-killed-twin-girls/
तर सोशल मीडियासोबतच राज्यभरातून सर्वच क्षेत्रांतून या घटनेचा निषेध केला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम