माळवाडीत मंगळवारी कीर्तन सोहळ्याची सांगता

0
46

देवळा : तालुक्यातील माळवाडी येथे महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प पु अनेकरुपी महाराज (बिलमाळ) यांच्या कृपाशीर्वादाने महादेव मंदिरात भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्याची सांगता उद्या मंगळवार दि २१ रोजी कीर्तन केसरी ह भ प संजय नाना धोंडगे यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.

माळवाडी येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री च्या पार्श्वभूमीवर दि १८ पासून अभिषेक व विना पूजनाने करून कीर्तन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कालावधीत नामवंत कीर्तन कारांनी आपली सेवा बजावली . मंगळवारी(दि२१)रोजी याची सांगता होणार आहे.

याप्रसंगी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून, याचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या सोहळ्याचे अध्यक्ष दावल भदाणे , बाळासाहेब बागुल ,निंबा बागुल, साहेबराव बागुल, किशोर सूर्यवंशी, दिनकर भदाणे,श्रीराम गोसावी सुनील वाघ, पोपट भदाणे ,सुपलाल बागुल, अनिल गोसावी ,संजय सोनवणे, रतन बच्छाव, रिंकू जाधव, दिलीप गुंजाळ ,दिलीप शेवाळे, भगवान बागुल, कडू बागुल, अशोक वाघ, तुकाराम बागुल ,मयूर बागुल,आदींनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here