माळवाडी लोहोणेर येथील शेतकऱ्यांना भूसंपादन विभागाकडून मोबदला मिळावा ; आमदार डॉ राहुल आहेर

0
17

देवळा ; चांदवड देवळा मतदार संघातील एन.एच ७५२ जी मंगरूळ सटाणा महामार्गाचे काम सुरू असताना देवळा तालुक्यातील माळवाडी ते लोहोणेर येथील शेतकऱ्यांना भूसंपादनाबद्दल असलेला तिढा सोडविण्याकामी संबंधितांकडून मोजणी करून मार्ग काढावा अश्या आशयाचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिल्ली येथे मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिले आहे.

दिल्ली देवळा तालुक्यातील माळवाडी लोहोणेर येथील शेतकऱ्यांना भूसंपादन विभागाकडून मोबदला मिळावा या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देतांना आमदार डॉ राहुल आहेर समवेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आदी छाया सोमनाथ जगताप

याबाबत त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मंगरूळ ते सटाणा महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून, त्यातील चांदवड तालुक्यातील मंगरूळ, तांगडी ,मतेवाडी व देवळा तालुक्यातील माळवाडी, लोहोणेर महामार्ग लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाविषयी शंका असून संबंधितांच्या जमिनींचे मोजमाप करून त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे त्यांच्या जमिनी भूसंपादित होत असतील तर त्यांना मोबदला मिळावा यासाठी संबंधित विभागाला मंत्री महोदयांकडून सूचना कराव्यात अशा आशयाचे पत्र त्यांनी गुरुवारी दि २१ रोजी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले.यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here