ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालय तर्फे वृक्षरोपण

0
43

देवळा: ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालय माळवाडी
तर्फे धवळखडी, माळवाडी व फुले माळवाडी येथे भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. दि. २० जुलै बुधवार रोजी महात्मा फुले हायस्कूल येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी देवळा प्रादेशिक चे वन परिमंडळ अधिकारी श्री प्रसाद पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच धवळखडी येथे वृक्षारोपण केले.

कार्यक्रमा साठी देवळा प्रादेशिक चे वन परिमंडळ अधिकारी श्री प्रसाद पाटील, सुवर्णा मॅडम आणि सामाजिक वनीकरण देवळा चे पवार साहेब उपस्थित होते. याप्रसंगी माळवाडी व फुले माळवाडी गावचे सरपंच, उप सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक देवरे भाऊसाहेब व ग्रामसेविका सोनार मॅडम, तलाठी तात्या इं. अमोल एशी साहेब, पोलीस पाटील वाघ मॅडम व ग्रामस्थ आणि महात्मा फुले हायस्कूल माळवाडी चे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व अनेक विद्यार्थी मित्र उत्स्फूर्त सहभागी होते.

वाचनालयातर्फे सुशील बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. वाचनालयाचे प्रेमानंद बागुल, रमेश बागुल तुळशीराम बच्छाव, निकेश जाधव, हेमंत बागुल, तात्या भाऊ भदाणे, जालिंदर बागुल, नामदेव जगदाळे, सुनील वाघ.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here