Malegaon | मंत्री दादा भूसेंच्या प्रयत्नातून काटवण भाग ‘सुजलाम सुफलाम’

0
41
Malegaon
Malegaon

Malegaon | सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक तालुक्यांत पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये ४ ते ५ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे. तर, लहान मोठी धरणं, बंधारे आटल्यामुळे पाण्यासाठी लोकांची वणवण होताना दियात आहे. मात्र, मालेगावमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या २१ बंधाऱ्यांमुळे मोसम नदीचे २४ की.मी पर्यंत पाणी साठवले गेले असून, मोसम नदीवर असणाऱ्या काटवण भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न जवळपास संपला आहे. (Malegaon)

National youth fest | हा मान नाशिकला मिळाला ही अभिमानाची बाब – मंत्री दादा भुसे

Malegaon | ही गावं झालीत पणीमय 

या भागातील भायगाव, सावतावाडी, काष्टी, वाडेल, वडनेर, वजीरखेडे, वलवडे, यासारखी गावं या बंधाऱ्यांमुळे ‘सुजलाम सुफलाम’ झाली आहेत. ऐन उन्हाळ्यात एकीकडे जिल्ह्यातील इतर भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, महिला हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, जमीनी ओसाड पडल्याचे चित्र असताना मंत्री दादाजी भुसे यांच्यामुळे मोसम नदीवरील काटवण भागातील गावांचा पाणी प्रश्न मिटला असून, दुष्काळसदृश्य परिस्थिती असतानाही या गावांमधील बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. ऐन उन्हाळ्यात हे बंधारे या गावांची तहान भागवत असून, यामुळे गावकरी मंत्री दादा भुसे यांचे आभार मानत आहेत. (Malegaon)

Nashik Loksabha | दादा भुसेंच्या शिष्टाईला यश; करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश..?

पूर्ण जिल्हा पाणीदार करणार – मंत्री भुसे

महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम आहे. नैसर्गिक साधन संपत्ती अफाट आहे. त्याचे जतन करणे गरजेचे आहे. नाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात पुढारलेला आहे. मात्र काही वर्षांपासून पाण्यामुळे दुष्काळात होरपळत आहे. यावर उपाय म्हणून युती सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होत आहे. छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडिण्यात आले. यामुळे मालेगाव तालुक्यातील काही भागाचा प्रश्न मिटला आहे. मात्र येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हा पाणीदार बनविण्याचे स्वप्न आहे. – दादाजी भुसे (पालकमंत्री, नाशिक) 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here