Malegaon Vidhansabha | मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार आणि मंत्री दादाजी भुसे यांना उमेदवारी जाहीर झाली असून, ते 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अद्वय हिरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, काल 24 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना अद्वय हिरेंची (Advay Hiray) जीभ घसरली आणि त्यांनी मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) आणि कुटुंबीयांवरही टिका करत अनेक गंभीर आरोप केले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भुसे यांचा बाप काढत अगदी खालच्या पातळीवर टिका केली.(Malegaon Vidhansabha)
हिरे बरळले, मुख्यमंत्री अन् मंत्री भुसेंचा बाप काढला…
“यांनी 50 कोटी रुपये देऊन आमचे आमदार विकत घेतले. आमच्या पक्षाचे नाव काढलं. आमचं चिन्ह काढलं. वंदनीय बाळासाहेबांचासुद्धा फोटो यांनी चोरला. का बरं संभाजी शिंदेचा फोटो लाऊन लोकं मत देत नाही का..? मी माझ्या बॅनरवर माझ्या बापाचा फोटो अभिमानाने लावतो. तुला तुझ्या बापाचा लावता येत नसेल. तर दुसऱ्यांचा बाप चोरायचा का..? इकडे पण दगड्यांचा काही फोटो मी कधी पहिला नाही. यांच्या बापांचं कर्तुत्वच नाही म्हणून दुसऱ्यांचे बाप वापरावे लागतात”.
या शब्दांत अद्वय हिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या वडिलांचा एकेरी उल्लेख करत वडिलांचे कर्तुत्व काढत पातळी सोडून टिका केली. मालेगावात हिरे विरुद्ध भुसे हे समीकरण सर्वश्रुत असून, अद्वय हिरे हे मंत्री भूसेंवर नेहमीच टिका, आरोप करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी थेट त्यांच्या आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या वाडिलांवर आणि कुटुंबीयांवरही शेलक्या भाषेत टिका केल्याने महायुतीचे कार्यकर्ते आणि भुसे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Nashik News | हिरेंच्या शाळेत माजी पंचायत समिती सदस्याचा प्रताप; काम न करता लाटत होता वेतन
Malegaon Vidhansabha | भूसेंचा एकेरी उल्लेख करत टिका
मालेगावात गुन्हेगारी वाढत आहे. हे संबंध शहर गुंडांच्या ताब्यात जात असून, येथील प्रत्येक माणसाला सुरक्षित करायचे असल्यास या सर्व गुंडांचा पाठीराखा असलेला हा ‘महागुंड मंत्री’ आपल्याला घरी पाठवावा लागेल. मालेगावात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार होत आहे. पिण्याच्या पाण्यात, रस्त्यात, गटारीत, कचऱ्यातसुद्धा भ्रष्टाचार होत आहे, या शब्दांत दादा भुसे यांचा एकेरी उल्लेख करत हिरेंनी त्यांच्यावर सडकून टिका आणि आरोप केले.
मंत्री भुसे हे अद्वय हिरे यांच्या वडिलांच्या वयाचे असून, आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीवर पातळी सोडून टिका करणे हे कितपत योग्य आहे. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. विरोध करण्याचाही अधिकार आहे. मात्र, राजकारणातली भाषा, संस्कृती यांच्या मर्यादा मोडीत काढून फक्त व्यक्तिद्वेष मनात ठेवून हिरे यांनी अतिशय असभ्य अश्या भाषेत मंत्री भुसे आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केली. यावरून हिरेंचे अहंकारी रूप पुन्हा समोर आले असून, मालेगावचे जागरूक मतदारच याचे उत्तर 20 नोव्हेंबरला नक्कीच देतील, अशी संतप्त भावना भुसे समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यावरून आता मालेगावचे राजकारण चांगलेच पेटले असून, हिरेंच्या या विधानाचा शिंदे गटाकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.
Malegaon | हिरे कुटुंबीयांचे हात बरबटलेलेच; काळ्या करणाम्यांची मालिका सुरूच
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम