Malegaon | बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगाव बंद

0
86
Malegaon
Malegaon

Malegaon |  गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात (Nashik News) बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला हिंसक वळण लागल्याने शहरातील हिंदू मुस्लिम संमिश्र भागात दंगल उसळली होती. मोठ्या प्रमाणात दगडफेकही झालयाने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथेही बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. मालेगावातील (Malegaon) सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनांच्या बैठकीत सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच सर्व पक्षीय या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

Malegaon | मालेगाव मनपात स्थानिक कर्मचारी भरती करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

Malegaon | पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

दरम्यान, मालेगावात बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून अतिरिक्त फोर्सही मागवण्यात आली आहे. आज दुपारी रामसेतू पुल येथून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. हा मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असून, येथे निवेदन देण्यात येणार आहे.

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये तेथील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या निषेधार्थ आज मालेगावमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. मालेगावातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, सर्वपक्षीय संघटना व सकल हिंदू समाज या बंदमध्ये सहभागी होणार असून, मालेगावमधील हिंदू बहुल पश्चिम पट्ट्यात कडकडीत बंद पाळला जात आहे. (Malegaon)

Malegaon | मालेगाव महापालिकेच्या 65 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन लागू


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here