Malegaon : मालेगाव बाह्य मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री यांनी मतदार संघातील विकास कामांचा धडाका लावला असून विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. जुलै-२०२३ मधील पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात मालेगाव बाह्य मतदार संघात 34 कोटी 64 लक्ष रुपयांच्या भरीव निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
Breaking : नमामी गंगे प्रकल्पावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट ; १५ ठार अनेक जखमी
पुरवणी अर्थसंकल्पात मालेगाव बाह्य मधील कामांसाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने मालेगाव-येसगाव- मळगाव-साकुरी (नि) रस्ता रा.मा. ४५३ कि.मी. २/०० ते ३/०० मध्ये रस्त्याची काँक्रीटीकरणासह सुधारणा करणे. ता. मालेगाव (भाग- शालीमार हॉटेल ते चंदनपुरी) यासाठी 9.50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रा.म.मा. ३ ते दसाने खडकी टोकडे अस्ताणे कौळाणे वागझरी रस्ता प्रजिमा क्र. १३१ कि.मी. ३/५०० ते ९/०० चे काँक्रीटीकरण करणे. ता. मालेगाव (भाग- दसाने ते खडकी) या कामासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रा.म.मा. ३ ते लोणवाडे दसाने मालेगाव कॅम्प सोयगाव टेहरे ते ५.५० व रा.म.मा. ३ ते कौळाणे रस्ता प्रजिमा १३७ कि.मी. ०८/०० ते |०९/९०० मध्ये रस्त्याची काँक्रीटीकरणासहीत सुधारणा करणे. ता. मालेगाव (फुलेनगर ते वजिरखेडे) या कामासाठी 5.50 कोटी निधी मंजूर करण्यात आला.
मालेगाव जि. नाशिक येथे ५ मंडळ अधिकारी व २६ तलाठी कार्यालय बांधकामासाठी 5.50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामा-३ रस्ता कि.मी. ०/०० ते ३/५०० व पुल रा.मा. १९ पांडूरंग सिनबंद ते रा.मा. २० रस्ता कि.मी. २/७० व सी.डी. वर्क कि.मी. ०/८०० भिंतीचे काम करणे. ता. मालेगाव जि. नाशिक या कामासाठी 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
गारेगाव ते कजवाडे रस्ता सुधारणा आणि ग्रामा १३ लहान पुलाचे बांधकाम करणे. ता. मालेगाव जि.नाशिक यासाठी 199.60 लक्ष रुपयाचा कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाल्याने दळण वळणासह प्रशासकीय कार्यालयांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे पावसाळी अधिवेशनात या कामांना मंजुरी मिळाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम