नाशिक प्रतिनिधी : राज्यात सरकार बदल झाल्यानंतर काही मागण्या पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. बहुप्रतीक्षित ‘मालेगाव जिल्हा निर्मिती’ आणि ‘नार-पार वळण योजना’ या दोन महत्त्वाच्या विषयांवर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले असून, यासंदर्भात शिंदे शनिवारी मालेगावात दौऱ्यावर असताना मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
मालेगाव जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतल्यास आपली भूमिका काय ?
होय/ नाही आपले मत नोंदवा..
मालेगाव जिल्हा निर्मिती झाली पाहिजे का आपली भूमिका काय ?
— The Point Now (@ThePointnownews) July 28, 2022
अनेक वर्षांपासून जिल्हा निर्मितीची मागणी प्रस्तावित आहे मात्र इतर तालुक्यांच्या विरोधामुळे या निर्णयाकडे फारसे गांभीर्याने कोणी घेतले नाही, मात्र शिंदे जिल्हा निर्मितीचा विषय हाती घेत घोषणा करणार का याकडे लक्ष लागून आहे. शनिवारी, ३० जुलै रोजी मुख्यमंत्री शिंदे नाशिक, मालेगाव दौऱ्यावर येत आहेत. वर्षानुवर्षे मालेगाव वासीयांना जिल्ह्या निर्मितीचे गाजर दाखवले जाते; परंतु, थेट घोषणा होऊन कार्यवाही कधीच झालेली नसल्याने मालेगावसह संपूर्ण जिल्ह्याचे शिंदेंच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
मालेगाव तसा कायमच दुर्लक्षित केला गेला आहे संवेनशील असा हा तालुका आहे, क्षेत्रफळ देखील पूरक आहे मात्र अद्याप यावर निर्णय झालेला नाही, राजकिय मतभेद असल्याने हा निर्णय कायमच भिजत ठेवला आहे, दस्तुर खुद्द हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील जिल्हा निर्मिती करू अशी घोषणा केलेली आहे. मात्र त्यावर निर्णय झालेला नाही . निव्वळ राजकारण वा राजकीय लाभापोटी जिल्ह्याची घोषणा नको, प्रत्यक्षात एखाद्या जिल्ह्यासाठी असलेली सारीच यंत्रणा मिळायला हवी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मालेगाव मध्ये विभागीय आढावा बैठक घेणार असून या आढावा बैठकीत मालेगाव जिल्हा निर्मिती होण्याची शक्यता आहे.
या तालुक्यांचा होणार समावेश...!
नांदगाव, सटाणा, देवळा, चांदवड आणि कळवण या तालुक्यांचा नव्या जिह्यात होऊ शकतो समावेश तर मनमाड आणि नामपूर या दोन तालुक्यांच्या निर्मितीची घोषणा होणार आहे. सगळे निर्णय हे झाले असून आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. जिल्हा निर्मितीला कळवण, देवळा, चांदवड या तालुक्यातून विरोध होण्याची शक्यता वाढली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम