Malegaon | मांजरपाडा दोन प्रकल्पाबाबत धुळे लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना अभ्यास करण्याची गरज आहे. मांजरपाडा दोन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. असा शासन आदेश त्यांनी जाहीर करावा. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, अन्यथा त्यांनी मालेगावच्या व धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची जाहीर माफी मागावी.(Malegaon)
डॉ. सुभाष भामरे (Dr. subhash bhamare) हे धुळे (Dhule) लोकसभा मतदारसंघातील जनतेची मांजरपाडा दोन प्रकल्पाबाबत दिशाभूल करत आहेत. राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पा अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वॉफकोस इंडिया कंपनीने नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाचे सर्वेक्षण केले होते. परंतु महाराष्ट्र गुजरात व केंद्र सरकार यांच्यातील असलेला तो समंजस्य करार आता रद्द झालेला आहे. महाराष्ट्र सरकार स्वतः हा प्रकल्प तयार करेल, अशी घोषणा विधिमंडळात महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा मंत्र्यांनी वेळोवेळी केली आहे. त्यासाठी साडेआठ हजार कोटी रुपये खर्च आहे.
Malegaon | मालेगावात सामूहिक नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज
मतदान मागायला येणार नाही, ‘त्या’ घोषणांचा विसर पडला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2022 च्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नारपार गिरणा लिंकिंग मांजरपाडा प्रकल्पाला दोन महिन्यांच्या आत मान्यता देण्याचे आश्वासन चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या लक्षवेधी सूचनेवर दिले होते.(Malegaon)
त्याला आता दीड वर्षाचा कालावधी लोटला. परंतु अजूनही त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे डॉ. सुभाष भामरे यांनी जनतेची दिशाभूल करणे बंद करावे. सन 2019 च्या निवडणुकीत मालेगाव तालुक्यात विविध ठिकाणी नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प मार्गी लावल्याशिवाय पुढच्या निवडणुकीत मतदान मागायला येणार नाही, अशा घोषणा केल्या होत्या. त्याचा विसर त्यांना पडला आहे.(Malegaon)
Malegaon | यांना मालेगावात मतदान मागण्याचा अधिकार आहे.?
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन धुळे ते पिंपळगाव याचे सहा पदरीकरणाचा विषय 2016 मध्ये मंजुरीची घोषणा भामरे यांनी केली होती. ती अजून पूर्णत्वास आली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर ठीक ठिकाणी वेळोवेळी अपघात घडतात. याचे उत्तर डॉ. भामरे यांनी द्यावं. कोरोना काळात मालेगावच्या रुग्णांना धुळ्यात प्रवेश देऊ नये, अशी मागणी करणाऱ्या खासदाराला मालेगावच्या जनतेकडे मतदान मागण्याचा नैतिक अधिकार आहे का..? हा प्रश्न मालेगावकर म्हणून डॉ. भामरे यांना विचारू इच्छितो, असा सवाल आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार यांनी केला आहे. (Malegaon)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम