शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा देण्यासाठी दत्तक योजना खाजगीकरणाचा घाट नव्हे – मंत्री भुसे

0
14

मालेगाव: पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा गुणवत्ता विकास कार्यशाळा कार्यक्रम मालेगाव येथे संपन्न झाला यावेळी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की विद्यार्थी घडला तर देश घडेल विद्यार्थी हा देशाचा आरसा आहे. भविष्यात देशाची वाटचाल गौरवशाली बघायची असल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील विद्यार्थी यांच्यातील गुणवत्ता वाढविणे गरजेचे असून उज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे महत्त्व तळागाळात पोहचवून दर्जेदार शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मंत्री भुसे यांनी केले.

यावेळी पालकमंत्री भुसे यांनी कौळाणे गावातील शाळेचा कायापालट यावर गौरवोद्गार काढले. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून देवघट शाळेची आकर्षक इमारत आदींसह काही शाळांचा नामोल्लेख करत बदलत्या काळानुसार पालकांचे योगदान शिक्षणासाठी किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले, कामाच्या जोरावर वेगळी ओळख मिळत असते. त्यासाठी समर्पण महत्वपूर्ण असून विकासाच्या टप्प्यात शिक्षणाला प्राधान्य देऊन काम करायचे आहे. यासाठी प्रत्येकाने झोकून द्यावे असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले.

भुसे पुढे म्हणाले की शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा देण्यासाठी दत्तक योजना राबविण्यात येणार असून खासगीकरण होणार नसल्याची ग्वाही देखील भुसे यांनी यावेळी दिली. ॲरोमा थिएटरमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी पालकमंत्री दादा भुसे, होते तर अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल होत्या. यावेळी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित विक्रम आडसुळ, ज्योती बेलवले, गटविकास अधिकारी भारत वेंदे मंचावर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उदयकुमार आहेर

गटविकास अधिकारी भारत वेंदे यांनी मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील शैक्षणिक बाबींचा आढावा मांडला.
तर ज्योती बेलवले ह्या म्हणाल्या की मनाची तयारी असली की ध्येय साध्य होते. शाळा बदलण्यासाठी इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य होते. गावची शाळा बदलण्यासाठी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम व शालेय कामकाज याबाबत ओघवत्या शैलीतून माहिती दिली.

ज्योती कदम यांनी पालकमंत्री व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मॉडेल स्कूल संकल्पना कशी साकारली जाते याबाबत माहिती यावेळी सादरीकरण केलं. राकेश पवार व विक्रम आडसुळ यांनी सांगितले की स्वतःची छोटीशी वस्ती शाळा असून तिच्यात झालेल्या बदलाचे चित्रफिती दाखवली. तिच्या बदलांसाठी शिक्षकांचा पुढाकार महत्वाचा आहे. पालकांची जनजागृती व बदलत्या स्वरूपास मदत मिळते.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षणा शिवाय विकास अशक्य आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. समस्या असतील नक्कीच पण त्यावर मार्ग काढू पालकमंत्री यांच्या प्रेरणेतून १२८ शाळा जिल्ह्यात मॉडेल झाल्या आहेत, भविष्यात सर्व तालुका मॉडेल करण्यासाठी काम करूया यासाठी तुमचे योगदान महत्वाचे असेल असे असा विश्वास मित्तल यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक संदीप सुर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन गायत्री आहेर, विद्या पाटील, ज्योत्स्ना काकळीज यांनी केले.
या कार्यशाळेतला प्रभारी गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, नांदगावचे प्रमोद चिंचोले यांच्यासह विविध गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामसेवक व तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here