Malegaon | २०० खाटांचे सामान्य रुग्णालय हे ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाल्याने अतिरिक्त १०० खाटांच्या इमारत बांधकामाचे रु. ७५९९.५१/- लक्ष एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्यास मान्यता देण्यात आली. यासाठी मंत्री दादाजी भुसे यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करत यास मंजूरी मिळवली आहे.(Malegaon)
२०० खाटांचे सामान्य रुग्णालय, मालेगाव जि. नाशिकचे ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाल्याने अतिरिक्त १०० खाटांच्या इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित आहे. सदर अंदाजपत्रक हे इमारतीच्या बांधकामासह नियोजित आहे. सदर अंदाजपत्रकामध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग, फर्निचर, विद्युतीकरण, पाणी पुरवठा व मल:निस्सारण, आग प्रतिबंधक, पार्कींग, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत व गेट, भु- विकास, वातानुकुलीत यंत्रणा सी.सी.टि.व्ही. इ.साठी तरतूद करण्यात आली आहे.(Malegaon)
मालेगाव येथे सद्यस्थितीत २०० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू असून त्याचे 300 खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाल्याने सदर रुग्णालय शहर, तालुक्यासह पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर महिला रुग्ण येत असतात. त्यामुळे शहर व तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्री भुसे यांनी रूग्णालयाच्या संदर्भात बैठका घेतल्या होत्या. या मंजूरी नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आरोग्यमंत्री यांचे नामदार दादाजी भुसे यांनी आभार मानले आहेत.(Malegaon)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम