देवळा प्रतिनीधी; मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना राजकीय वातावरण देखील टाळण्यास सर्वात झाली आहे. मालेगाव जिल्हा निर्मितीची बातमी समजताच शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी आक्रमक होत मालेगाव जिल्हा करायचा तर करा आम्ही जिवाची बाजी लावू पण, देवळा तालुका समावेश मालेगाव जिल्ह्यात नको अशी भूमिका घेत मालेगाव जिल्हा निर्मितीत देवळा तालुक्याचा समावेश करण्याला तीव्र विरोध असल्याचे ठणकावले आहे.
मालेगाव जिल्हा निर्मिती झाली पाहिजे का आपली भूमिका काय ?
— The Point Now (@ThePointnownews) July 28, 2022
उदयकुमार म्हणाले की राज्यात बरेच मोठे जिल्हे आहेत. त्यांचे विभाजन होत नाही. मग मालेगाव जिल्हा निर्मितीचा घाट फक्त राजकिय फायद्यासाठीच का ? चांदवड देवळा मतदार संघातील चांदवड नाशिक मध्ये आणि देवळा मालेगाव मध्ये असल्याची चर्चा आहे म्हणजे दोन भावांची राजकिय वाटणीच आहे की काय? असा प्रश्न आहेर यांनी केला आहे. याउलट कळवणला आदिवासी जिल्हा म्हणुन घोषित करून आदिवासी बांधवांना न्याय द्यावा. अशी मागणीही त्यांनी केली आहे.
देवळा तालुक्यातील जनतेची नाळ नाशिक सोबत जोडली गेली आहे. शिक्षण, आरोग्य आदी बाबींसाठी नाशिक प्रगत अणि सोयीचे आहे. नाशिकला पौराणिक तसेच ऐतिहासिक वारसा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जिल्हा म्हणून नाशिकचे नाव अभिमानाने मिरवता येते. मालेगावमध्ये अभिमानाने मिरवावे असे काय आहे ?असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
देवळा तालुक्याचे निर्माते स्व. डॉ. दौलतराव आहेर यांचाही मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी विरोध होता. त्यांचीच भूमिका आ.डॉ. राहुल आहेर यांनी सरकार दरबारी पुढे न्यायला हवी. आमदार राहुल आहेर यांनी फक्त छान छान ची भूमिका घेवू नये. आम्ही सामाजिक प्रश्नांवर लक्ष घालण्यासाठी त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणुन निवडून दिले आहे. अन्यथा जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल अन् त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशाराही आहेर यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम