Makar Sankranti | हिंदू धर्मानुसार अनेक सण – उत्सव आपण साजरे करत असतो. त्या प्रत्येक सणाला काहीतरी महत्त्व असते. तसेच ते सण साजरे करण्याच्या पद्धतीमागेही काही शास्त्र असते. आज मकर संक्रांत आहे. आज पतंग उडवण्याची, तीळगुळ वाटण्याची, थोरा मोठ्यांचे आशिर्वाद घेण्याची, काळे वस्त्र परिधान करण्याची पद्धत आहे. मात्र, मकर संक्रांतीला (Makar Sankranti) तीळ का दिली जाते आणि ही पद्धत कुठून सुरू झाली हे आपण आज जाणून घेणार आहोत.
अशी झाली मकर संक्रांतीची सुरुवात
उत्तरायणाच्या दिवशी शनि देवाने जबलपूर येथे नर्मदा नदीच्या तीरी आपले वडील सूर्य देवांना सर्वप्रथम तीळ अर्पण केले. तेव्हापासून हा तीळ संक्रांतीचा उत्सव सुरू झाला. यानंतर त्या जबलपूरच्या घाटाला ‘तिलवाडा घाट’ असे नाव पडले आणि येथे आता प्रत्येक वर्षी मकर संक्रांती निमित्त भव्य जत्रा भरते.(Makar Sankranti)
Makar Sankranti | …आणि यामुळे मकर संक्रांतीला ‘पतंग’ उडवतात
असे आहे तिळाचे धार्मिक महत्त्व
मकर संक्रांती या सणाच्या दिवशी तीळाचे दान व सेवन केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. तसेच तुमच्यावर जर शनीची साडेसाती किंवा ढीय्या असल्यास त्यांचे अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते. तसेच शनि देवासह सूर्यदेवाचीही कृपा प्राप्त होते.
Makar Sankranti | मकर संक्रांतीची कथा ?
पौराणिक संदर्भात एक कथा आहे की, भगवान सूर्य देवांणा संज्ञा देवी आणि छाया देवी या दोन पत्नी होत्या. शनिदेव हा छाया देवीचा मुलगा आणि यमराज हा संज्ञा देवीचा मुलगा होता. छाया ही यमराजाशी भेदभाव करत असल्याचे सूर्य देवांनी पाहीले आणि त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी छाया देवी आणि शनीला स्वतःपासून दूर केले. त्यामुळेच छाया देवी आणि शनि हे रागावले आणि सूर्यदेवाला त्यांनी कुष्ठरोगाचा शाप दिला.(Makar Sankranti)
Shani Shingnapur | शनि शिंगणापुरच्या ‘शनि’ मंदिरात नेमकं काय घडतंय..?
काळ्या तीळांनी सूर्याची पूजा करावी?
पौराणिक मान्यतेनुसार, आजच्या दिवशी यमराज याने कठोर तपश्चर्या करून आपले पिता सूर्यदेवाला छाया आणि शनि यांनी दिलेल्या कुष्ठरोगाच्या शापापासून मुक्ती मिळवून दिली. मात्र, सूर्यदेवांनी क्रोधित होऊन शनिदेवाच्या घरातील कुंभ हा भस्मसात केला. तसेच, यामुळे छाया देवी आणि शनिदेवांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यानंतर यमराजांनी त्यांचे सूर्यदेवांना छाया आणि शनिदेव यांना शापातून मुक्त करण्याची विनंती केली. त्यानंतर जेव्हा सूर्यदेव आणि यमराज हे शनिदेवाच्या घरी गेले तेव्हा तिथले सर्व काही जळून गेले होते.(Makar Sankranti)
त्यावेळी शनिदेवाकडे फक्त काळे तीळ तेवढे उरले होते. म्हणून त्यांनी त्या उरलेल्या काळ्या तिळानेच सूर्यदेवांची पूजा केली व त्यांना प्रसन्न केले. त्यावली सूर्यदेवाने शनिला आशीर्वाद दिला की, जो कोणी आजच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाने माझी उपासना करेल त्याच्यावरील सर्व संकटांचे मी हरण करेल. तसेच, शनिदेवानेही त्यांना वचन दिले की, जो कोणी भक्त मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करेल. त्याला कधीही कसला त्रास होणार नाही. त्यामुळे आजच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ देण्याला अध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व दिले जाते.
(टीप – वरील सर्व ‘द पॉइंट नाऊ’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम