Road accident : अपघात बघायला गेले आणि मागून आलेल्या गाडीने त्यांना दूरवर चिरडत नेले

0
40

Road accident : गुजरात मध्ये एक विचित्र अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे. गुजरातमधील अहमदाबाद मध्ये असलेल्या इस्कॉन पुलावर आज भीषण अपघात झाला या झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अपघातामध्ये तब्बल 15 ते 20 जण जखमी असल्याचं देखील बोललं जातंय

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदाबाद मधील इस्कॉन पुलावर बुधवारी मध्यरात्री एक चारचाकी आणि डंपरची वाहनात जोरदार धडक झाली. आणि अपघात झाला, हा भीषण अपघात पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांची गर्दी जमू लागली होती व तितक्यात मागून एक गाडीने येऊन गर्दीतील लोकांना चिरडलं आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे.

झालेल्या भिषण अपघातामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश असून डंपर आणि गाडीचा अपघात झाल्यानंतर अपघाताची तपासणी करण्यासाठी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचा देखील या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सरखेज-गांधीनगर या महामर्गावर इस्कॉन पुलावर बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यावेळी जखमींना तात्काळ एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ज्या गाडीने या गर्दीला चिरडले त्या गाडीचा चालक देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. त्या चालकाला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून या अपघाताची सखोल चौकशी करण्यास देखील सुरुवात झाली आहे. तसेच ज्या मुलांचा यामध्ये मृत्यू झाला आहे त्यांचे नातेवाईक देखील मृतांची ओळख पटवण्यासाठी पोहोचले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. ज्यावेळी हा अपघात झाल्या त्यावेळी काही विद्यार्थी या पुलावर फिरत होते. त्यामुळे या अपघातामध्ये या विद्यार्थ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

https://thepointnow.in/landslide-alert-to-kolhapur/

या विद्यार्थ्यांकडून पोलीस डंपर आणि गाडीच्या अपघाताची माहिती घेत होते. तेवढ्यातच एक भरधाव वेगाने गाडी आली आणि ही सगळे लोक त्या गाडीखाली चिरडली गेली. जवळपास 200 मीटरपर्यंत ही गाडी या लोकांना फरफटत घेऊन गेली. या भीषण अपघातानंतर इस्कॉन पुलावर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या अपघातानंतर पोलिसांनी इस्कॉन पूल वाहतुकीसाठी बंद केला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here