Nashik News | उत्पादन घटल्याने मका तेजीत; दरांत 20 टक्क्यांनी वाढ

0
14

Nashik News | जिल्ह्यासह कसमादे परिसरात कांदा व फळ शेतीनंतर सर्वाधिक उत्पन्न हे मक्याचे घेतले जाते.  काही वर्षांपासून खरीप हंगामात मका पीक हे आघाडीवर आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. दरम्यान, उत्पादन घटल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भावात २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

यापुढेही भाव आणखी वाढू शकतील, असा अंदाज बाजारपेठ अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नाशिक येथील बाजारात बागलाण, नांदगाव, चाळीसगाव आणि साक्री ह्या भागातून मकाची मोठ्याप्रमाणात आवक होत आहे.

कसमादे भागात शेतकरी हे खरीपात मक्याचे उत्पन्न घेतात. पण यंदा पावसाअभावी मक्याची वाढच झाली नाही. अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना चारा म्हणून अर्धवट पीक काढून घेतले आहे. याचदरम्यान, चांगला भाव मिळाल्याने शेतकरी कांदा लागवडीकडे वळाले.

Nashik | रात्री गारपीट; सकाळी ८ वाजताच पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

एरव्ही दसरा ते दिवाळी या काळात मका मोठ्याप्रमाणात बाजारात विक्रीसाठी येते. पान, यंदा उत्पादन घटल्याने २४ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या काळात फक्त ५६ हजार २८९ क्विंटल इतक्याच मक्याची बाजारात आवक झाली आहे.  बाजारभाव क्विटंलला एक हजार ८५० पासून ते २ हजार ३११ तर, सरासरी २ हजार १२५ रुपये असा होता.

दिवाळीची सुट्टी संपल्याने मजूर कामावर परतलेत. जिल्ह्यात मका काढणीचे काम हे जोरात सुरू आहे. परिणामी, सध्या बाजारात आवकही वाढली आहे. शनिवार (दि. २५) ४०० ट्रॅक्टर मक्याची बाजारात आवक झाली. ओला मका हा १ हजार ९०० ते २ हजार १०० तर, वाळलेला मका २ हजार १५० ते २ हजार २५०,आणि सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल ह्या भावाने विकला गेला.

उत्पादन कमी असल्याने यावर्षी डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत मक्याची आवक होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील बाजारात एप्रिल-मेमध्ये बिहार, उत्तरप्रदेशमधील मका येतो. घाऊक व्यापारी हे परराज्यातील मका ही पोल्ट्री खाद्य कारखाने तसेच इतरांना पुरवत असतात.

देवळा | लैंगिक अत्याचार प्रकरणी उमराणे गाव कडकडीत बंद; आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here